संजय राऊतांनी वाईन उद्योजकांसोबत करार केला; सोमय्यांचा आरोप

raut somaiyya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद अजूनही सुरू आहे. दरम्यान वाईनबाबत ठाकरे सरकारने नुकताच एक निर्णय घेतला. यावरून आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला. वाईनबाबत बोलणाऱ्या राऊतांचे अशोक गर्ग यांच्यासोबत अनेक दिवसांपासून संबंध आहे. गर्ग याच्यासोबत पार्टनशिप असलेल्या राऊतांचे अनेक उद्योग आपण बाहेर काढणार आहोत, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,“संजय राऊत परिवाराने 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. यानंतर 12 जानेवारी 2022 रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती मंत्रालयाला दिली आहे. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात” आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने वाईनला परवानगी देऊन महाराष्ट्रातील अस्मितेला ठेस पोहचवली आहे. या वाईनला परवानगी दिल्यानंतर राऊत म्हणाले की वाईन म्हणजे काय? वास्तविक वाईन उद्योजकाशी राऊत कुटूंबियांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे. वाईन निर्मितीची मॅगपी कंपनी असलेल्या उद्योगात राऊत कुटूंबियांची भागीदारी आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

दरम्यान आज सोमय्या यांनी वाईन विषयावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करीत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे त्यानंतर सोमय्या यांच्या आरोपांना राऊत काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.