शिक्षणाचा अभूतपूर्व घोळ घोळ घालणारे आघाडी सरकार, तुमची “इयत्ता कंची?”; शेलारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढलेला होता. त्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने मत व्यक्त करीत तो रद्द करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या प्रकारावरून भाजपकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप नेते अ‌ॅड. आशिष शेलार यांनी “ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही. शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्याआघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. अकरावीची सीईटी रद्द करताना मा. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारलेय. “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय.

ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार आम्ही अनेक बाबी लक्षात आणून दिल्या. न्यायालयाने फटकारले. तरीही लहरी सरकार काहीही शिकलेच नाही.शिक्षणाचा हा अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या आघाडी सरकारला आता विचारावेसे वाटते. तुमची “इयत्ता कंची?”

Leave a Comment