हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यांनी आता आपला मोर्चा पवार कुटुंबाकडे वळविला आहे. “मी दिवाळीनंतर आणखीन एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे सादर करणार आहे,” असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर आणखीन एक गंभीर आरोप केले. आयकर विभागाने राज्यातील पाच साखर कारखाण्यांवर छापा टाकला. यात अजित पवार यांच्याशी संबंधित कारखानेही आहेत. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांच्या बहिणी भागीदारी आहेत. अजित पवार यांच्याप्रमाणे मी दिवाळीनंतर आणखीन एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवार यांच्याबद्दल सांगायचे झाले तर अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दलचे घोटाळ्याचे पुरावे ईडीकडे सादर करणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अजित पवार यांनी त्यांच्या बहिणीच्या नावे अनेक कंपन्या सुरु केल्या आहेत. तरीही ते खोटे बोलत आहेत. २७ हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीनी भेट घेत जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजित पवार यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे याबाबात लवकर तोडका काढावा, अशी मागणीही केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.