एसटी संपाबाबत सरकारची भुमिका हि जीवघेणी; फडणवीसांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. अशात भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. एसटी संपाबाबत सरकारची भुमिका हि जीवघेणी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मुलीच्या लग्नानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. या दरम्यान त्यांनीमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडून मागण्या मान्य केल्या जात नसल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी झाली आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यम मार्ग मी सुचवला आहे. योग्य तो निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या विषयावर फडणवीस म्हणाले की, टीका करणारे टीका करतात तर काम करणारे काम करतात. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवला. मात्र, ज्यांच्याकडून टीका केली जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेले नाही. आता टीकाकारांना जनताच उत्तर देईल. कारण टिकाकारांची भूमिका हि दुटप्पी अशी असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले.

Leave a Comment