एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून जुलमी दडपशाही; प्रवीण दरेकरांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्याला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठींबा दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीका केली. “एकीकडे मागण्यांबाबत तोडगा काढत असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे काम सरकारकडून केले जात आहे. अशा प्रकारे राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी दडपशाही केली जात आहे. राज्य सरकारनेही आपली दडपशाही करू नये, असा आरोप दरेकर यांनी केला.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचारी आपल्या जीवाला वैतागले आहेत. अशात त्यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनास राज्य सरकारकडून अडवणूक केली जात आहे. अशा प्रकारे जुलमी दडपशाही सरकारने करू नये. आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशात सरकारकडून कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे.

एकाबाजूला अवमान याचिका म्हणून निबन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी आम्ही दारे खुली करत आहोत, असे सांगायचे. राज्य सरकारची हि दुट्प्पी भूमिका आता लोकांच्या लक्षात आली आहे. ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. आपण त्यांना त्यांच्या हक्क मागण्यापासून त्यांना थांबवू शकत नाही. आता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना अधिक आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असे दरेकर म्हणाले.

Leave a Comment