हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करीत त्यांना आव्हानही दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची नवाब मलिक यांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं”, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत पुन्हा नवाब मलिक याने दिलेले आव्हान स्वीकारले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे की, “कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची श्री. नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला?,”
कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची श्री. नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला? https://t.co/YwPEUioIE9
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 31, 2021
नवाब मलिक यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले होते. चंद्रकांत पाटील मी वाट पाहतोय की तुम्ही मला आपल्या मोठ्या खिशात टाकावं. मी पाहिल तुमच्या खिशात काय काय आहे आणि बाहेर येऊन जनतेला सांगेन. त्यांचा एवढा मोठा खिसा असेल तर लवकरात लवकर त्यांनी मला खिशात टाकावं मी वाट पाहतोय, असे मलिक यांनी म्हंटले. मलिकांनी दिलेले आव्हान चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले आहे.