हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे या दोघांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. एकमेकांवर वारंवार टीकास्त्र डागणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्रित मंचावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरआज राणेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेत अनेक हप्तेखोर आहेत. त्या हप्तेखोरांची नावे आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करू, असा इशारा राणेंनी दिला आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, “सिंधुदुर्गातील उद्योजकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्याचे काम केले जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठीसुद्धा ठेकेदारांचीअडवणूक करण्यात आली. “कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे. या हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार आहे. कोकणाच्या विकासाला आड येणाऱ्या लोकांचा भांडाफोड मी उद्याच्या सभेत करणार आहे.”
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरु होणार याचा आनंद आहे. 1997-98 साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. तेव्हापासून विमानतळ व्हावी, अशी माझी इच्छा होती. 15 ऑगस्ट 2009 साली या विमानतळाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. ज्यावेळी विमानतळाचे भूमिपूजन करत होतो, तेव्हा शिवसेना जमीन संपादित करू नका, विमानतळ आम्हाला नको म्हणून आंदोलन करत होती. विनायक राऊत त्यावेळी विमानतळाच्या विरोधात आंदोलन करत होते आणि आज श्रेय घ्यायला पुढे येत असल्याची टीकाही यावेळी राणेंनी केली आहे.