हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्यातील मंत्री थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असून त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहीत पवार हे अज्ञानी आहेत, त्यांनी माहिती घेऊन बोलावे असं बोंडे म्हणाले.
अनिल बोंडे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फोन वरून चर्चा झालीय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.जीएसटीचे पैसेही केंद्र सरकार देत आहे. राज्य सरकारने आपली जबाबदारी टाळून केंद्राकडे बोट दाखवू नये. फडणवीस सरकार असताना या आधी उद्धव ठाकरे यांनी जी मागणी शेतकऱ्यांसाठी केली होती तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी असंही ते म्हणाले.
गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जो शब्द दिलीय तो त्यांनी पुर्ण करावा ती वेळ आलीय असंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते रोहित पवार??
दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेत आहे. पण केंद्रानेही GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी तातडीने द्यावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’