हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांच्या अटके प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबद्दल भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी परिवहन मंत्री अनिल परब व अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेतील ऑडिओच्या प्रकरणाची व त्यातील मंत्री व आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करन्यायाची वेळ आली असल्याची असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
यावेळी आमदार शेलार म्हणाले की, “नारायण राणे यांच्या अटकेच्या प्रकरणात अनिल परब यांच्याकडून हस्तक्षेप करण्याचा प्रकार झालेला आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकार काम करत आहे त्या पद्धतीचा ऑडिओ क्लिप हा पुरावा आहे. या प्रकरणाची मंत्र्यांसहित अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत असल्याचे आमदार शेलार यांनी सांगितले.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद https://t.co/muvoOvyOcx
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 25, 2021
यावेळी नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी बोलताना आमदार शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले. नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण अगदी संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी आमदार शेलार यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रजासत्ताकदिनाची आठवण करून देण्यासाठी भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्याना ७५ हजार पत्रे लिहणार आहे. त्यांना भाजपकडून तशा प्रकारची पत्रे पाठवली जाणार आहेत. जेणेकरून त्यांना आठवेल की, कितवा प्रजासत्ताकदिन आहे, असेही यावेळी आमदार शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.