‘एका’ ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला- आशिष शेलार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. राज्य सरकारने कुलपती असणाऱ्या राज्यपालांना विश्वासात घेतले नाही. शिक्षणतज्ज्ञांची मते धुडकावली. केंद्रीय अनुदान आयोगाला UGC जुमानले नाही. मंत्रिमंडळातही अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर चर्चा केली नाही. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरुंना विश्वासात घेतलं नाही, शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अंहकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. तर, एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला, असा खोचक टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार. ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला. महाराष्ट्रातील ‘पाडून दाखवा सरकारने’ स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले आहे., अशी उपरोधिक टीका शेलार यांनी केली आहे. तर विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका. परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ या. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल. तुमचे भविष्य उज्वलच आहे, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment