रेशन कार्ड पोर्टेबिलिटी म्हणजे काय ? आपल्याला त्यापासून कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच आता रेशनकार्डदेखील पोर्ट करता येते. मोबाइल पोर्टेबिलिटीमध्ये आपला नंबर बदलत नाही तसेच आपण तो देशभर वापरू शकतो. त्याचप्रमाणे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही आपले रेशन कार्ड बदलणार नाही. याचा अर्थ असा आहे की, जर आपण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेलात तरी आपण आपल्या रेशन कार्डचा वापर करून दुसर्‍या राज्यातून सरकारी रेशन खरेदी करू शकाल.

रेशन कार्डच्या पोर्टेबिलिटीसाठी पीडीएस दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसेससह व्हेरीफिकेशन केले जाते. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर लाभार्थीची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवरून इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे पटवली जाईल. यासाठी व्हेरीफिकेशनच्या वेळी रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे. आपले व्हेरीफिकेशन आधार क्रमांकावरूनच केले जाते. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या रेशनकार्डधारकांना रेशन मिळेल. अन्न पुरवठा विभागाचे नियंत्रक कैलाश पगारे यांनी ही माहिती शेअर केली. ‘वन नेशन-वन राशन कार्ड’ या योजनेत समाविष्ट असलेल्या 23 राज्यांतील रेशनकार्डधारकांची आता महाराष्ट्रात बदली होणार आहे. ते म्हणाले की, ‘तेही त्याचा फायदा घेऊ शकतात.’

समजा, राजीव कुमार (काल्पनिक नाव) हे बिहारचे रहिवासी आहेत आणि त्याचे रेशनकार्डही बिहारचे आहे. या रेशनकार्डच्या माध्यमातून ते उत्तर प्रदेश, दिल्ली किंवा मुंबई येथे सरकारी दरातील रेशनही वाजवी दरात खरेदी करू शकतील. हे स्पष्ट आहे की, या नियमांची कोणतीही मर्यादा किंवा बंधन नाही. ते देशातील कोणत्याही राज्यात रेशन खरेदी करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतेही नवीन रेशनकार्ड लागणार नाही. याचा अर्थ असा आहे की केवळ आपले जुने रेशन कार्डच यासाठी वैध असेल.

बर्‍याच दिवसांपासून तक्रारी आल्या आहेत की, रेशनकार्डधारकाला ज्या दुकानातून रेशन मिळत असेल त्याने ते ठिकाण सोडून इतर कोणत्याही ठिकाणाहून रेशन घेतल्यास त्याचे नाव कोट्याच्या दुकानातून हटवले जाईल आणि नंतर त्याला रेशन उपलब्ध होणार नाही. म्हणूनच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना लागू केली गेली आहे. ज्यामध्ये आता ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कुठूनही रेशन खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.