हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या गुजराती मेळाव्यावर खडसून टीका केली आहे. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी टीका आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना केली आहे.
तसेच ठाकरे सरकारने काल भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे त्यात नारायण राणे यांचा देखील समावेश आहे याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही,” असं शेलार म्हणाले.
दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यांनतर राणे यांनी सरकारवर टीका केलीये. त्यांनी जीवाचं काही बरंवाईट झालं तर याला सरकार जबाबदार असेल असं सांगितलं आहे. “राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




