ठाकरे सरकार असंवेदनशील आणि अकार्यक्षम; आशिष शेलारांची टीका

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “असंवेदनशील, अकार्यक्षम सरकार असे वर्णन कोणाचे करायचे असेल तर ते ठाकरे सरकारच करावे लागेल. एसटी कर्मचाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, अशी टीका ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी व ठाकरे सरकार असंख्य प्रशांनकडे पाठ दाखवून ड्रग्ज समोर गुडघ्यावर टेकून फक्त नतमस्तक होताईत, असे शेलार यांनी म्हंटले.

यावेळी शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली. मलिक हे एक जबाबदार मंत्री आहेत. मलिक हे बालिश विधाने करत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब हे परिवार मंत्री झाले आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे. कर्मचाऱ्यांचं तोंड गोड करण्याऐवजी कडू करण्याचं काम या सरकारकडून केले जात आहे. सध्या भाजपबद्दल जी काही डायलॉगबाजी केली जात आहे. त्या फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here