काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले, तुम्हीही त्यांना रेशनवरून जाब विचारा- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना रेशन वाटपातील गोंधळावरून आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांना रेशनवरून जाब विचारा, असं पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल सायंकाळी नगरच्या भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले.

चंद्रकांत पाटील नगरच्या भाजप कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधतांना कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न आणि समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. रेशन पुरवठ्यातील गोंधळासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काँग्रेसने इंधन दरवाढी विरूद्ध केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत भाजपच्या कार्यकर्त्यांनाही त्याच पद्धतीने आवाज उठविण्याचा सल्ला दिला.

कोरोनाच्या काळात गरीबांना धान्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने योजना जाहीर केल्या. मात्र, ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात राज्य सरकार गोंधळ करत आहे. इंधनदरवाढीच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तुमच्याच जिल्ह्यातील आहेत. त्यांना यासंबंधी जाब विचारा. त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आंदोलने केली. त्यामुळे रेशनच्या प्रश्नांवर आपणही आंदोलन करावीत. संबंधित पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार यांना घेराव घालून जाब विचारा,’ अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment