हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. यावरून भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघाती निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची अवस्था हि ‘आ बैल मुझे मार’ अशी झाली आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांबाबत सांगायचे झाले तर मलिक यांची अवस्था हि आ बैल मुझे मार अशी झाली आहे. त्यांना धावता धावता हे कळत नाही कि समोर खड्डा आहे. त्यांना फक्त निष्ठा कळते. त्या निष्ठेने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ते बोलत आहेत.
मलिक यांना अजूनही एक कळत नाही की, ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. तेच कबुली देत आहेत की हि जमीन मी घेतली ती जमीन मी घेतली त्याची. सध्या मलिक जे काही करत आहेत. त्यावरून एकच गोष्ट कळते कि या सर्वांतून मलिक हे खड्यांच्या दिशेने जात आहेत, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा खंबीर पाठिंबा -चंद्रकांत पाटील
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भारतीय जनता पक्षाचा खंबीर पाठिंबा आहे. सरकारला ठिकाणावर ठेवण्याचे काम विरोधकांचे आहे आणि आम्ही ते करत आहोत, असेही पाटील म्हणाले.