पुणे । विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याला भाजपचा विरोध नाही आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस करणं चुकीचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नव्हता. तरी त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याच्या शिफारशीची एवढी घाई का केली गेली? उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून सदस्यत्व देण्याचा निर्णय एका दिवसात घेता येईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णयच मुळात चुकीचा वरुन उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडूनच राजकारण सुरू असल्याचा प्रत्यारोप पाटील यांनी केला.
पंतप्रधान केअरला निधी पाठवण्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही काही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पैसे पाठवायला सांगितले का? केंद्र सरकारच्या पी एम रिलिफ फंडला पैसे द्यायला हरकत नाही. केंद्र सरकारने सर्वाधिक साहित्य महाराष्ट्राला दिलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने परप्रांतीय कामगारांना स्वतःच्या बसेसमधून त्यांच्या राज्यांमधे पोहचवावं. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमधे कामगारांना पोहोच करावं. ते करताना सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करुन बसमध्ये कामगारांना बसवण्यात यावं आणि त्यांच्या गावांमध्ये पोहचवण्यात यावं, असंही ते म्हणाले.
तसेच लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त सैनिकांची मदत घेण्यात यावी. होमगार्ड आणि एसआरपी रस्त्यांवर आणता येईल का याचा विचार व्हावा. ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळलेत तिथं लोकांना दहा दिवसांसाठी पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची कीट्स पुरवण्यात यावीत. लोक दुध घेण्यासाठी देखील बाहेर पडू नयेत, अशा सूचनाही चंद्रकांत पाटील म्हणाले.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.