Sunday, March 26, 2023

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धोनीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले गेल्याने दिनेश कार्तिक झालेला आश्चर्यचकित

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने आश्चर्य वाटले होते असे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक म्हणाला.सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने विकेट गमावल्या होत्या आणि कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजी करण्यास सांगितले.या निर्णयाने कार्तिकला आश्चर्य वाटले.

कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, “हे माझ्यासाठी अगदी आश्चर्यकारक होते कारण ते मला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवतील असे स्पष्टपणे सांगत होते.विकेट पडणे थांबवण्यासाठी आम्हाला हे करावे लागले. मला पॅड बांधावे लागले आणि हे सर्व घाईघाईने घडले. “तो म्हणाला, “विकेट इतक्या लवकर पडतील असे मला त्यावेळी वाटले नव्हते. अचानक लोकेश राहुल आउट झाला आणि मला माझा पॅड बांधावा लागला.”

- Advertisement -

India vs New Zealand 1st Semi-Final: Matt Henry sends back Karthik ...

कार्तिक म्हणाला, “मी तिसऱ्या षटकात आतमध्ये गेलो आणि केव्हा आउट झाले ते कळलेही नाही. परंतु ट्रेंट बोल्टने जोपर्यंत स्पेल पूर्ण केली नाही तोपर्यंत आम्हाला विकेट घसरण्यापासून रोखणे आवश्यक होते.पण दुर्दैवाने जिमी नीशमच्या जबरदस्त झेलमुळे मी आउट झालो. “

या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.