रात्री कोणाला अटक झाली तर…; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काही नेत्यांच्या मागे ईडी चा ससेमिरा मागे लागला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. मी इथेच नाशिक मध्ये आहे, रात्री कोणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यावी लागेल अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद संपल्यानंतर तिथून निघाले. त्यावेळी त्यांच्या आसपास भाजपचे पदाधिकारी होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्या मुक्कामाबद्दल प्रश्न केला. त्यावर त्यांनी ‘मी इथेच आहे. काय माहीत, रात्रीच कोणाला अटक झाली तर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल ना’, असं विधान केलं.

दरम्यान, राज्यातील अनिल देशमुख, प्रताप सरनाईक तसेच एकनाथ खडसे हे ईडीच्या रडारावर असून काल च अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता ईडी करून जप्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here