काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही, असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही घेणार आणि सरकार स्थापन करणार, आम्ही नकार द्यायला भजन मंडळी नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पक्षातून आपल्याकडे अद्याप कोणीही आलेलं नसल्याचा खुलासाही चंद्रकांतदादांनी केला.

“काशीस जावे नित्य वदावे” या उक्तीनुसार बोलत राहायचं, काशीला कधी जायला मिळेल, माहिती नाही. तसं सरकार पडणार, भाजप येणार, हे म्हणण्यात काय अडचण आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या दृष्टीने आम्ही कोणतीही पावलं टाकत नाही. सरकार पाडण्याच्या फंदात आम्ही पडत नाही, ती आमची संस्कृती नाही. मग तुम्ही विचाराल मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काय घडलं? तर, काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही काय भजन मंडळी नाही, आम्ही काय कोणाला घेत नाही, असं म्हणणार नाही. आम्ही त्यांना घेणार आणि सरकार स्थापन करणार. पण महाराष्ट्रात अजून कोणी आलेलं नाही” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ”तुम्ही काही केलं नसेल, तर चिंतेचं कारण नाही, निश्चिंत राहा, ईडी काय तयार करणार आहे का?” असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला. (Chandrakant Patil talks On Maha Vikas Aghadi Government)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment