Wednesday, February 1, 2023

‘तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा’; चित्रा वाघ यांची जीभ घसरली

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखल्या जातात. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची टीका करताना जीभ घसरली आहे. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीका करताना त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. “ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा. माझ्या नादी लागू नका,जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती, तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता तुमच्या, या शब्दात चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा”, असेदेखील त्या म्हणाल्या.

- Advertisement -

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या महिलांना कोणी नाकारु शकत नाही. 50 टक्के महिला जनशक्ती आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला तुम्हाला मंत्री म्हणून दिसतील, असं सूचक विधान चित्रा वाघ यांनी केलं.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती