हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उर्फी जावेद (Uorfi Javed) हि आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. तिच्या या विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोध केला जात आहे. तिने विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्लादेखील तिला अनेकजणांनी आला आहे. तर काही लोकांनी तिच्या (Uorfi Javed) या फॅशन सेन्समुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावरून आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत तिच्या अटकेची मागणी केली आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1608877744938717190
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या (Uorfi Javed) अटकेची मागणी करणारे एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत म्हंटले कि, “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी भाजपाकडून उर्फी जावेदच्या नावाचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने एक ट्वीट केले होते. या ट्विटवर उर्फी (Uorfi Javed) चांगलीच भडकली होती. तिने या ट्विटला आक्रमक असे उत्तर दिले होते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता.
हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट