हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पूण्यातील मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लीनचीत देण्यात आली असल्याने याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाघ यांनी शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
पुणे पोलिसांनी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लीनचिट दिल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हंटल की, शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लीनचिट देण्यात आलेली नसून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे. याबाबत आम्ही पुणे पोलिस आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यावेळी राठोडांना कोणत्याही प्रकारची क्लीनचिट देण्यात आली नसल्याचे सांगितले. एका मुलीला आत्महत्येला प्रवृत्त करणे व त्याप्रकरणी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आजही आमची मागणी आहे.
पुण्यात मुलीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राठोड ला @PuneCityPolice नी क्लीनचीट दिल्याच्या बातम्या येत आहेत तसेच राज्यभरातून फोन ही येत आहेत
या संदर्भात मी स्वत: सकाळी पुणे पोलिस आयुक्तांशी बोलले असता त्यांनी स्वत: या बातमीचं खंडन केलं आहे व यात तथ्य नसल्याचं म्हंटलयं— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 16, 2021
राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत न्यायालयाकडेही आम्ही धाव घेतली आहे. न्यायालयाने आम्हालाच न्याय मिळवून द्यावा व राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आजही आम्ही मागणी करीत आहे, असे सांगत वाघ यांनी यावेळी पुणे पोलिसांना इशारा दिला आहे. वाघ यांनी म्हंटल आहे कि, पोलिसांनी संजय राठोड यांच्यावरील गुन्ह्याबाबत खरी माहिती द्यावी. एका ठिकाणी एवढा मोठा गुन्हा घडला. आणि पोलिसांकडून एफआरआयही दाखल केली जाऊ नये. म्हणून आम्ही न्यायालयात न्यायाच्या हक्कासाठी गेलो असल्याचे वाघ यांनी यावेळी म्हंटले आहे.