“रडने का नही, भिडने का”;पारनेरच्या महिला तहसिलदारांच्या भेटीवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सुसाईड ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे चांगल्याच चर्चेत आल्या. त्यांची नुकतीच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. या भेटीवेळी वाघ यांनी तहसीलदारांना ‘रडने का नही, भिडने का’ असे म्हणत आलिंगनही दिले. वाघ यांच्या भेटीमुळे तहसीलदार देवरे यांनी समाधान व्यक्त केले.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतीच पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची भेट घेतली. तत्पूर्वी वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर अनेकवेळा हल्लबोलही केला. “देव माणूस म्हणून मिरवणाऱ्याच्या नाकात महिला सशक्तीकरणावर बाता मारणारे वेसन घालणार का?”असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला होता.

तसेच ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

 

दरम्यान, वाघ यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची भेट घेणार असल्याचेही म्हंटले होते. त्यानुसार वाघ यांनी तहसीलदार देवरे यांची भेट घेतली. यावेळी वाघ यांच्याशी झालेल्या भेटीवेळी तहसीलदार देवरे यांनी म्हणातील खदखद त्यांना सांगितली. यावेळी वाघ यांनी देवरे यांना धीर देत त्यांच्या आपण पाठीशी आहोत असेही सांगितले.

Leave a Comment