हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत. मात्र, महाराष्ट्रा ठीक राहिला पाहिजे, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ते शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मला राजकारणापेक्षाही महाराष्ट्राची चिंता आहे. महाराष्ट्रामध्ये नो गव्हर्नन्स ही जी अवस्था पाहायला मिळतीय, ही अवस्था महाराष्ट्राने कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, त्याला कुठेही बट्टा लागता काम नये, याची खरी काळजी करण्याची गरज आहे.
दरम्यान काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक महाराष्ट्राला पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक टीकेला फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले. युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब आहे असा टोला फडणवीसांनी लगावला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मुळे हे अधिवेशन इतर कामकाजापेक्षा राजकीय कुरघोड्यांसाठीच गाजले.