‘राज्य सरकारच्या घोळामुळंचं मराठा आरक्षणाची ही स्थिती’; फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. सरकारच्या घोळामुळं मराठा आरक्षणाची ही स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरु होणार होती. मात्र, न्यायालयाचनं सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

‘मराठा आरक्षण केवळ सरकारच्या घोळामुळं अडचणीत आलं आहे. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. सरकार एक ठाम भूमिकाच मांडू शकत नाहीये. प्रत्येकवेळी नवीन भूमिका मांडली जाते. सरकारच्या दोन माडण्यांमध्ये मोठा फरक आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात घोळ चालला आहे. सरकारनं एक कमिटी केली आहे. ती कोणाशी चर्चा करते, ते काय निर्णय होतात ते काहीच समजत नाही. हे प्रकरण वाईट पद्धतीने हाताळण्यात येतंय,’ असा आरोपही त्यांनी केलाय.

‘राज्य सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, कोण कोणता निर्णय घेतंय हे कोणालाच माहिती नाही. सगळ्या प्रकारच्या आरक्षणावर कुठेतरी प्रश्नचिव्ह निर्माण व्हावं अशी परिस्थिती दिसतेय. त्यातूनच एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ निर्माण झालाय,’ अशी टीकाही त्यांनी केलीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

You might also like