मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातून त्यांना डिस्चाज मिळाला आहे. 24 ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी! असे आवाहन फडणवीस यांनी केले होते.
देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. रविवारी २०० मिली तर सोमवारी सायंकाळी तेवढाच प्लाज्मा देण्यात आला होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी किंचित कमी झाल्याने त्यांना काही स्टेरॉईडस् आणि रेमडेसीवरही देण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in