हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केले होते. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्रात मालेगावसह ठिकठिकाणी मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. यावेळी हिंसाचार, तोडफोडीच्या घटना घडल्या. यावेळी दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. मालेगाव व नांदेड या ठिकाणी घडलेल्या घटनेची राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
नांदेड व मालेगाव या ठिकाणी घडलेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या घटना अतिशय चिंताजनक असून याबाबत राज्य सरकारच्या वतीनेही खबरदारी घेण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.