देवेंद्र फडणवीसांना बिहार निवडणुक प्रभारी म्हणून भाजपतर्फे जवाबदारी दिली जाण्याची शक्यता

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्याकडून बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहार निवडणुक प्रभारी म्हणून पक्षातर्फे फडणवीस यांना जवाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये निवडणुकीठी भाजपने आधीच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर निवडणूक लढवतांना सर्वाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी देशातील प्रमुख भाजप नेत्यांना बिहारमध्ये पाचारण केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाही पाचारण केले जाण्याची अधिक शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासातील नेते आहेत. राज्य पातळीवर संघटन कौशल्य सिद्ध केले आहे. याशिवाय हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. दुसरी बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी स्वतःचे एक अढळ स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात तयार केलं आहे. बिहार निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवर जबाबदारी देत भविष्यात मोठ्या जवाबदारीची पक्षाकडून केली जाणार चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here