हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मत व्यक्त केले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही पण मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप पक्ष उभा असल्याचे मत भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परषद घेत मंत्री राणेंच्या वक्तव्याबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, पोलिसांकडून मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. सरकारने बस म्हण्टल्यानंतर काही लोक लोटांगण घालत आहे. केवळ सरकारला खुश करण्याकरिता पोलिस दल जर कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा योग्य राहणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो कि राणे यांच्या व्कव्याचे आम्ही समर्थन करणार नाही पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करतंय. त्याबाबत भाजप गप्प राहणार नाही.
राज्य सरकारला इशारा देताना फडणवीस म्हणाले की, जर भाजप कार्यालयावर जर कोणी हल्ला केला तर ते सहन केले जाणार नाही आम्ही हिंसा करीत नाही, आम्ही राडेबाज नाही. आमच्या कार्यालयावर जर कोणी चालून आलेना तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या कार्यालयावर हल्ला झाला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असले पाहिजे. तालिबानी नाही. सध्या जन आशीर्वाद यात्रा काहीकेल्या थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.