हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर लावून धरली आहे. आजच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. खडसे यांना कृषीमंत्रीपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितल्याने खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत होते. त्यातच त्यांनी आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला, असं खडसे म्हणाले. त्यावर योग्य मुहूर्त कोणता? असा सवाल त्यांना केला असता, योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं सूचक विधान खडसे यांनी केलं.
यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंबद्दल भाष्य करतं म्हटले होते की एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली.तसेच कामानिमित्त भेटीगाठी होत असतात .भेटीगाठी झाल्या म्हणजे काळबेर समजू नये असंही अजित पवार म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’