हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आणि भटक्या जाती- जमातीचा छळ करण्याचा विडाच उचलला आहे अशी खरमरीत टीका पडळकर यांनी केली आहे. त्यातच त्यांच्या गलथान कारभारामुळे महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ अशी अवस्था झाली असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, वडेट्टीवारांनी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षार्थ्यांच्या भविष्याचे कडेलोट करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काल कोणतीही पूर्वसूचना न देता युपीएससीची चाळणी परीक्षा १३ सप्टेंबरला वडेट्टीवार यांनी जाहीर केली. आता विद्यार्थी येणार कसे? परीक्षा देणार कसे कारण युपीएससी ची तयारी करण्यासाठी विद्यार्थी दिल्ली मध्ये असतात.
अतिसन्माननीय #विजय_वडेट्टीवारांनी आपल्या गलथान कारभारातून #महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता #महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतंय.@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @VijayWadettiwar pic.twitter.com/rvlK2AfjoH
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 11, 2021
काही विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा १० ऑक्टोबरला आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती चालू आहेत. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ अशी अवस्था झाली असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना दिल्लीत परीक्षा केंद्रे उभा करून द्या अन्यथा आम्ही सरकार विरोधात आंदोलन करू असा इशारा पडळकरांनी दिला.