.हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात एकमेकांवर टीका करत असताना स्वतःचा तोल जाऊ नये याची काळजी राजकीय नेत्यांना घ्यावी लागते. मात्र, अनेक नेत्यांकडून भावनेच्या भरात अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका केली जातेच. अशी टीका करताना भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. “जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्याला वाटतं फार हुशार आहे. मात्र, तो एक नंबरचा बिनडोक माणूस आहे. जयंत पाटील कुजका, कपटी, जातीयवादी, बिनडोक माणूस, अशी टीका पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावेळी ते म्हणाले की, जलसंपदा मंत्री आपल्या जिल्हातील आहेत पण ते डोकं तिसरीकडे लावतात. त्यांचं जे खातं आहे, त्यात त्यांचं डोकं लागत नाही. ‘आपल्याला वाटतं तो माणूस फार हुशार आहे. मात्र, तो एक नंबरचा बिनडोक माणूस आहे’
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1517564781946494
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याच्यावर टीका केली असल्याने आता राष्ट्रवादी व भाजप यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही पडळकर यांची अनेकवेळा मोठ्या राजकीय नेत्यांवर टीका करताना जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार याच्यावर टीका करताना पडलकरांनी म्हंटले होते की, शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली आहे.