हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या तथा माजी खासदार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणी तसेच सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा नवीन गंभीर आरोप केला आहे. अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्श आणि इमारतीसाठी 100 एकर जागा हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा खोतकर यांच्याकडून सुरू आहे. खोतकरांना मॉल तयार करायचा आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि बिल्डिंगसाठी ही जागा हवी आहे. सरकारने जी जागा दिली होती ती साखर कारखान्यासाठी दिली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. सर्व मिळून 240 एकर जागा आहे. त्याची किंमत 1 हजार कोटी आहे. आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे.
माजी खासदार श्री. किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद. https://t.co/4goDdfSlkD
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 27, 2021
यावेळी सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा सोडला. ते म्हणाले की, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना औपचारिक अटक करण्यात आलेली आहे. प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा जप्त करण्यात आलेली आहे. संजय राऊतांनी 75 लाख परत केले आहेत. अनिल परब यांचा तपास सुरू आहे. इतर सेना नेत्यांविरोधात तक्रार केली आहे. त्याचाही तपास सुरू आहे. माफिया सेनेतील 8 मोठ्या नेत्यांची चौकशी करून कारवाई सुरू असल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.