अडसूळांच्या ईडीच्या समन्सनंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्यांनी आता मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. दरम्यान सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याने याबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छोट्या गुंतवणूकदारासांठी झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणारचं,” असे सोमय्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान काळ सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोल्हापूर दौरा अडवून दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरील ईडीच्या कार्रवाईप्रकरणी सोमय्या म्हणाले की, “कोट्यावधी रुपये अडसूळ यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या पक्षातील असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्यावर काही कारवाई केली नाही”.

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. या प्रकरणी ते आज कोल्हापूर येथे जाऊन त्याची माहिती घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ईडीने अनेक समन्स पाठवल्यानंतरही अडसूळ जात नव्हते. त्यामुळे आज अडसूळ यांना अटक करण्यात आली आहे,” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Leave a Comment