हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य माणसापासून ते राजकीय नेते आणि कलाकार यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे .नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीनाही करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
स्वतः किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मी व माझी पत्नी यांना करोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. करोना संकटाच्या काळात सोमय्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष मदत केली होती. तर, वेळोवेळी राज्यातील करोना स्थितीवरही त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
Me & My Wife Prof Dr Medha Somaiya are tested COVID Positive. Both r hospitalized, treatment started
मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ मेधा सोमैया कोरोना पोझिटीव/बाधित झालो असून हॉस्पीटल मधे उपचार सुरू झाले आहे@BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 10, 2020
दरम्यान, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या घरातील ६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, तिघांचे चाचणी अहवाल अद्याप यायचे आहेत