लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, ‘मविआ’ला तर…; भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकार पडण्याचे भाकीत केले जात आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मोठे विधान केले असून आगामी काळात सर्वच पक्षांमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडणार आहेत. महाविकास आघाडीला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार मिळणं कठीण होईल, असे बावनकुळे यांनी म्हंटले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
काँग्रेसमढील नेते नाना पटोले सध्या अस्वस्थ आहेत. सरकार गेल्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. लाचार, दुराचार, भ्रष्टाचार यासाठी हे तीन लोक एकत्र आले होते. मूळ विचाराचे काँग्रेसचे लोक आपल्याच चुकीमुळे नाराज आहेत.

या लोकांनी बेईमानी करून सरकार स्थापन केले. काँग्रेस उद्धवजींसोबत गेल्याने पक्षातील अनेक लोक नाराज आहेत. ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे, युतीबद्दल ते टीका करत आहेत, असे बावनकुळे यांनी म्हंटले.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल. मात्र फडणवीस हे हुशार माणूस आहेत. त्यांनी सरकार पडेल म्हणून काँग्रेसचे 22 आमदार आधीच तयार करून ठेवले आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असं ते म्हणाले.