हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात भ्रष्ट्राचारा वरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं संतुलन बिघडले अशी टीका मोहित कंबोज यांनी केली
“१६ फेब्रुवारी रोजी संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेतात आणि अनेक आरोप लावतात. १७ फेब्रुवारी रोजी जेव्हा मीडिया संजय राऊत यांना प्रश्न विचारते, तेव्हा म्हणतात कोणत आहे किरीट सोमय्या? मला त्यांच्याबाबत कधी प्रश्न विचारायचा नाही. १८ फेब्रुवारी रोजी संजय राऊत ट्वीट करून किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा आरोप करतात. १९ फेब्रुवारी रोजी जेव्हा सकाळी विचारलं जातं, जेव्हा आरोपाला उत्तर किरीट सोमय्यांकडून दिलं जातं, तेव्हा संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल अपशब्द उच्चारतात आणि मीडियाला धमकवतात की मला किरीट सोमय्या यांच्याबद्दल नाही विचारायचं.
त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांबद्दल अनेक अपशब्द बोलतात आणि नंतर किरीट सोमय्यांबद्दल ट्वीट करतात. संध्याकाळी म्हणतात किरीट सोमय्यांबद्दल काहीच बोलायचं नाही, पत्रकाराने विचारलं तर त्याला बोट दाखवून धमकावलं जातं. २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सकाळी किरीट सोमय्यांवर ते आरोप करत ट्वीट करतात.”
संजय राऊत यांच्या स्वप्नात किरीट सोमय्या येतात आणि किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची झोप उडवली आहे. ज्या प्रकारे ते एकदिवस काही बोलतात दुसऱ्यादिवशी वेगळं काही बोलतात. त्यामुळे संजय राऊत यांचं बारामतीची हर्बल वनस्पती घेऊन, मानसिक संतूलन बिघडलं आहे. त्यांना किरीट सोमय्यांची भीती वाटत आहे असंही मोहित कंबोज यांनी म्हंटल.