हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान, आज मुंबईत एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर निशाणा साधला. “कोणत्याही निवडणुका घ्या आणि पहा. मातोश्रीत बसलेल्याना कायमस्वरूपी घरी बसवू,” असा इशारा देत मंत्री राणेंनी हल्लाबोल केला आहे.
यावेळी राणे म्हणाले की, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी राज्य सरकारकडून मदतही करण्यात आली. मी जेव्हा पहिला दौरा चिपळूणला केला. त्यावेळी पंतप्रधानांना सांगितल्यानंतर त्यांनी कृषिमंत्र्यांना सांगून ७०० कोटींची मदत पाठवली. मात्र, राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यातही दिरंगाई केली आहे. पुरग्रस्थांना मदत पोहचवण्यात महाविकास आघाडी सरकार हे अपयशी पडलेले आहेत. शिवसेनाचा आशीर्वाद हा आम्हाला नकोय, त्यांचा आशीर्वाद आम्हाला महागात पडेल. तो नको आहे.
यावेळी शिवसेनेवर टीका करताना मंत्री राणे म्हणाले की, आम्ही जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून एकच सांगतो कि शिवसेनेने कोणत्याही निवडणुका घ्याव्यात. नंतर बगावे कोण जिकंतो आणि कोण हरतो. मातोश्रीत बसलेल्याना निवडणुकीनंतर कायम स्वरूपी घरी बसवल्याशिवाय राहणार नसल्याचे मंत्री राणेंनी यावेळी म्हंटले.