मुंबई । आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
“या स्टार कॅम्पेनर्सना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचले नाही हा इतिहास आहे,” अशा शेलक्या शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.
ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे. https://t.co/YaRorAy1Qs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 8, 2020
कोण आहेत स्टार प्रचारक ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार
बिहार निवडणुकीत शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. असं असलं तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच निवडणुकीचे निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”