…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही ; निलेश राणेंचा अजितदादांवर निशाणा

0
26
nilesh rane ajitdada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणी झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्यानंतर भाजपचे खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती.

निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधानही अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत. अजित पवारांच्या या विधानानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितलं. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here