“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्रालाही सतर्क रहायला हवं”; निलेश राणेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्का देणारी घटना नुकतीच घडली आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले आहे. संपूर्ण जगामध्ये चर्चेत असणाऱ्या या विषयावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावरुन एक इशारा दिला आहे. “महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स”,असल्याचे राणेंनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी महत्वाचे ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवळं नाही,”

भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याबरोबर टोलाही लगावलेला आहे. महाराष्ट्रातील मुंबई शहरात अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. मात्र, काही झाले तर केंद्र सरकारला दोष देतील आणि नंतर सांगतील कि, केंद्राने कळवले नाही, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला आहे.

Leave a Comment