मुंबई । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी शाळा आणि लोकल ट्रेन इतक्यात सुरु करू नयेत, असे सांगितले होते. तसेच दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवर धरले.
”अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.”
अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2020
तत्पूर्वी भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेला लक्ष्य केले होते. दारुची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट राज्य सरकारने केव्हाच उघडली आहेत. पण रुग्ण मात्र चार दिवसांपूर्वी उघडलेल्या मंदिरामुळे वाढले, हे महापौरांचे तर्कट आहे. हा तर्क नाही शिवसेनेचा खरा चेहरा आहे”, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in