हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर तसेच शिवसेनेवे वारंवार टीका केली जाते. तर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांच्याकडूनही निशाणा साधला जातो. दरम्यान, “377 अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?, असे ट्विट करीत निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना सवाल करीत टोलाही लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, MP सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये 377 अंतर्गत एम्पिरिकल डेटा (OBC) केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. 377 अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग ह्या आयुदा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?
MP सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये 377 अंतर्गत एम्पिरिकल डेटा (OBC) केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. 377 अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग ह्या आयुदा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 9, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी आता सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा धागा पकडून नीलेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे.