त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संजय राऊत तुम्हाला…; निलेश राणेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी भाजपनेते निलेश राणेंकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी नावाने टीकास्त्र डागले जाते. आजही पीडित महिलेच्या प्रकरणावरून निलेश राणेंनी पुन्हा एकदा राऊतांवर निशाणा साधला आहे. “त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. भाषेची वार्ता करतो, तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संजय राऊतांनी वापरली आहे ती ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करणार” असा इशारा राणेंनी दिला आहे.

निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “संज्यामुळे त्रस्त झालेली पीडित महिला काही कारणांमुळे कोर्टात बाजू मांडू शकली नाही पण आम्ही हायर कोर्टात जाणार आहोत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संज्या तुला सोडणार नाही. भाषेची वार्ता करतो, तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संज्याने वापरली आहे ती ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो.”

भाजपचे नेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचा व शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाद रंगत आहे. दरम्यान आज पत्रकार परिषदेतून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री नारायण राणेंवर टीका केली. यावरून राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी ट्विट करीत राऊतांना ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा इशारा दिला आहे.