हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू सणांवर राज्य सरकारने निर्बंध लावले असल्याने यावरून आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे निवेदनदेत मागणीही केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू सणांवर निर्बंध लावण्याचे ठाकरे सरकारचे धोरण आहे. हिंदू सणांचे महत्व कमी करण्याचे काम हे सरकार करत आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती, तशी राज्यात ठाकरे सरकारला घडवायची आहे,” अशी टीका राणे यांनी केली.
राज्यात हिंदू सणांवर निर्बंध हटवण्याबाबत आज भाजपनेते नितेश राणे यांनी राज्यपाल कोशारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी राणे म्हणाले की, सध्याचे ठाकरे सरकार हिंदू सणांचे महत्व कमी करण्याचे काम करीत आहेत. एकीकडे सरकारकडून मात्र कार्यक्रम घेतले जात आहेत. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रम कार्यक्रमात त्यांना कोरोना दिसत नाही का?मात्र, दुसरीकडे जेव्हा हिंदू सण साजरा करण्याचा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो. सरकारच्या या निर्बंधांच्या धोरणांमुळे हिंदू सणांचे महत्व कमी होताना दिसत आहे.
राज्य सरकारकडून गणपती उत्सवांदरम्यान कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करीत निर्बंध लादले आहेत. त्यामुळे याविरोधात भाजपचे नेते नितेश राणे हे आक्रमक झाले असून याविषयी तोडगा काढण्यासंदर्भात त्यांनी आज राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.