हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले. मात्र, या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर मात्र, सडकून टीका केली आहे. “हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण”, असे ट्विट करीत राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
भाजप कार्यकर्त्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांकडून दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान राउत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो..
याचे उत्तम उदाहरण 👇@rautsanjay61 pic.twitter.com/D3zuFQGJkr— Nitesh Rane (@NiteshNRane) December 14, 2021
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक फोटो शेअर केला आहे. आंही त्या फोटोवर त्यांनी ‘हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो.. याचे उत्तम उदाहरण’ असे लिहीत खाली बोट दाखवले आहे. राणेंच्या या टीकेनंतर राऊत काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.