काँग्रेस मजबूत झाली पाहिजे हीच माझी इच्छा; गडकरी असे का बोलले ??

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होत आहे . लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सतत निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली ‘इच्छा’ आहे असे नितीन गडकरी यांनी म्हंटल.

नितीन गडकरी म्हणाले, लोकशाही दोन चाकांवर चालते, ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोध पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी हीच माझी इच्छा आहे. एकीकडे काँग्रेस कमकुवत होतअसताना त्यांची जागा इतर प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे लोकशाहीसाठी चांगले नाही. अशा स्थितीत विरोधी पक्ष मजबूत झाला पाहिजे असे नितीन गडकरी यांनी म्हंटल

पराभवानंतर “कमजोर होऊ नका” आणि पक्षासोबत राहा असे आवाहन गडकरी यांनी काँग्रेस नेत्यांना केले. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत खंबीरपणे राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच आहे असे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी यासंदर्भात काही उदाहरणे दिली. ते म्हणाले, मी १९७८-८० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते पुण्यात आलो होते. मी रेल्वे स्थानकावर उतरलो तेव्हा पक्षाचे प्रचार साहित्य माझ्या खांद्यावर दिले होते. त्याचवेळी श्रीकांत जिचकार (महाराष्ट्रातील जुने काँग्रेस नेते) यांनी मी चांगल्या पक्षात जावे, ज्यामध्ये माझे भविष्य आहे, असा सल्ला दिला. तेव्हा भाजपचे फक्त २ खासदार होते. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी विहिरीत उडी मारून आत्महत्या करेन, पण माझी विचारधारा सोडणार नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here