सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पंकजा मुंडे यांची ठाकरे सरकावर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला आता पुन्हा निशाणा साधला जात आहे. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. अनेकवेळा ओबीसी आरक्षणासंदर्भात मागणी करूनही या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्हाला इम्पिरिकल डेटा आणि सेन्ससमधला फरक तरी कळतो का? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी घणाघाती टीका केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून लोक बघत आहेत.राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर जे आघाडीचे सरकार आले. त्यांनी जनतेच्या हितासाठीच काम करणे गरजेचे होते. ओबीसी आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयी राज्य सरकारने वेळीच काळजी घेणे गरजेचे होते. आरक्षण स्थगित झाल्यापासून ते रद्द होण्यापर्यत राज्य सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले गरजेचं होते. मात्र, तसे झाले नाही.

ओबीसी समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचे ढोंग या सरकारने घेतले आहे. या अध्यादेशाविरोधात लोक औरंगाबाद खंडपीठात गेले. न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहूनच आरक्षणाबाबतची कार्यवाही होत आहे. त्यामुळे ओबीसींच्या डोक्यावर निवडणूक लढवताना टांगती तलवार राहणार आहे. ही दुर्देवी गोष्ट आहे. ओबीसींच्या पाठित खंजीर खुपसणारी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात 86 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. फेब्रुवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 85 टक्के निवडणुका होणार आहेत. आरक्षण मिळायचं असेल तर इम्पिरिकल डेटावर काम झाले पाहिजे, असे मुंडे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment