हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मरियदित प्रितपाल बेलचंदन यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रीतपाल यांच्यावर आपल्या ओळखीचा वापर करून बँकेच्या नावाने 15 करोड रूपये घेतले असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीतपाल यांच्या सुटकेची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता प्रीतपाल बेलचंदन यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रीतपाल हे डोंगर गावचे भाजप प्रभारी अधिकारी आहेत. भाजप सरकारने 2014 मध्ये त्यांना जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यादरम्यान त्यांनी बँकेत लोनच्या नावावर 14.89 करोड रुपयांचा घोटाळा केला होता. याची तक्रार 2021 मध्ये बँकेचे सीईओ पंकज सोढ़ी यांनी केली होती. तेव्हा पोलिसांनी पुराव्याच्या आधारावर प्रीतपाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती.
याप्रकरणी केलेल्या पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे की, 234 प्रकरणात प्रीतपाल यांनी निबंधक सहकारी संस्थांची परवानगी न घेता 13.5 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण निर्दोष असल्याचा दावा प्रीतपाल यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटून लावला आहे. यानंतरच पोलिसांकडून प्रीतपाल यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 15 वर्षांच्या काळात प्रीतपाल यांना बँकेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. परंतु त्यांनी या पदाचा गैरवापर करत काही लोकांना गैरपद्धतीने लोनच्या नावावर करोडो रुपये मिळवून दिले. अशा पद्धतीने त्यांनी बँकेत तब्बल 15 करोड रुपयांचा घोटाळा केला असल्याचे समोर आले. आता या घोटाळ्याची प्रीतपाल यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांचा दावा आहे की, हा घोटाळा 15 करोड पेक्षा देखील जास्त असू शकतो.