हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एकमेकांचे नेते फोडायचे नाहीत असं ठरलं असतानाच आता शिंदे गटाने हा तह मोडत थेट भाजपच्या महामंत्र्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुक काही महिन्यांवर आली असतानाच राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे. राम यादव यांच्या रुपाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात पक्षवाढीसाठी शिंदे गटाला त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गानंतर सरकार आणखी 2 महामार्ग सुरु करण्याच्या तयारीत; कोणती शहरे जोडणार?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/mZEC1UY73X#hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 19, 2022
दरम्यान, शिंदे गटाने भाजपचा महामंत्रीच फोडल्यामूळे भाजप आणि त्यांच्यात अंतर्गत कुरबुरी होण्याची शक्यता आहे. राज्यात जरी नेतेमंडळी एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर मात्र वेगळेच चित्र आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. आगामी काळात या फोडाफोडीच्या राजकारणामुळे नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.